Monday, 3 October 2016

'पाकला दहशतवादी देश जाहीर करा'; रक्ताने पत्र

धरमशाळा (हिमाचल प्रदेश) - दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला "दहशतावादी देश‘ जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी धरमशाळा येथील कार्यकर्ते डॉ. महेश यादव यांनी आपल्या रक्ताने संयुक्त राष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.

यादव यांनी संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की-मून यांना स्वत:च्या रक्ताने हिंदीमध्ये पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाकला दहशतवादी देश जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्‍मिरमधील कोटली येथील स्थानिकांनी आज (रविवार) सकाळी पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय करत असलेल्या अत्याचारांविरुद्ध रस्त्यावर येऊन निदर्शने केली.

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment