आजचे युग हे संगणकीय आणि माहितीचे युग आहे. सैन्यात असो की निवृत्त, फार मोजकाच सैनिक परिवार या आधुनिक तंत्रज्ञानाशी आणि अद्ययावत माहितीशी जोडला गेलेला आहे , बहुतांश सैनिक हे या अद्यावत, आधुनिक कल्याणकारी माहिती पासून मात्र वंचित झाले आहेत, अशी सद्य परिस्थिती पहावयास मिळते.
मासिक सैनिक दर्पण हा माजी सैनिक, त्यांचे पाल्य, वीर पत्नी , वीर माता , वीर पिता यांच्या साठी एक कल्याणकारी उपक्रम आणि माजी सैनिकांना जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणून सतत प्रयत्नशील आहे. सैनिक दर्पण मध्ये सैनिकांसाठी असलेल्या विविध योजना, सरकारी आदेश (GR), सैनिकांचे विविध संघटने तर्फे घेण्यात आलेली चर्चासत्रे, आंदोलने, कार्यक्रम , मेळावे , उपोषणे (उदा. One Rank One Pension) बद्दल माहिती, राज्य व राष्ट्र पातळीवर माजी सैनिकांशी निगडीत असलेल्या घटना व निर्णय, सैनिकांच्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, माजी सैनिकांचा अनुभव अशा विविध गोष्टींचा सैनिक दर्पण मधील सदरांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
माजी सैनिक व परिवारासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना , अत्याधुनिक, अद्ययावत, उपयुक्त व मार्गदर्शक माहिती विविध माध्यमांमध्ये असते. या सर्वच माध्यमांपर्यंत सर्वाना पोहोचणे शक्य नसते. आपण आवश्यक माहितीपासून वंचित राहू नये, म्हणून ती माहिती विविध मध्यामान्धून एकत्रीत करून, माजी सैनिक परीवारापर्यंत पोहोचविण्यासाठी सैनिक दर्पण ची टीम सतत प्रयत्नशील असते. विविध अडचणींवर मात करीत सैनिक दर्पण टीम महाराष्ट्र सह अनेक राज्यात दरमहा ३००० ते ३५०० अंकाचे वितरण करते. त्यातले काही अंक परदेशापर्यंत जातात. समाज सेवेच्या या भावनेस आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळेच हे शक्य झाले, असेच आपले प्रेम व प्रतिसाद या पुढेही राहो हीच अपेक्षा.
भविष्यात सैनिक दर्पण च्या माध्यमातून माजी सैनिकांच्या असलेल्या समस्या अडचणी , जसे की निवृत्ती वेतनाचे प्रश्न , शिक्षण व व्यवसाय , ECHS संबंधी अडचणी , कायदेशीर सल्ला , यासाठी प्रयत्न करणार आहे . सैनिक दर्पण मध्ये आजून कोणते विषय समाविष्ट असावेत या विषयी आपल्या प्रतीक्रीयाचे स्वागत आहे.
माजी सैनिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी, माजी सैनिकांच्या विविध संघटना व पदाधिकारी यांच्या मनात असलेली माजी सैनिकांप्रती तळमळ, आपुलकी व निष्टा तसेच त्यांनी केलेली विविध कार्य हे सर्व माजी सैनिकांपर्यंत पोहचवण्यासाठी सैनिक दर्पण हे अत्यंत उपयुक्त व प्रभावी मध्यम आहे. आपणही सैनिक दर्पणच्या या कल्याणकारी उपक्रमात खालील प्रमाणे सहभागी होऊ शकतात
- सैनिकांच्या समस्या अडचणी लेखी कळवून
- सैनिकांसाठी असलेली माहिती, योजना, लेख , कथा, कविता व साहित्य पाठवून
- विभागीय संस्था, समारंभ, मेळावे व कार्यक्रमाचा वृत्तांत देऊन
- आपण करत असलेल्या उद्योगाची माहिती व जाहिरात देवून
- सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , धार्मिक , कार्याची माहिती कळवून
- सैनिक दर्पण चा विशेष अंक पुरस्कृत करून
- सैनिक दर्पण च्या अंकांचे वितरण करून
- खालीलप्रमाणे देणगी दॆउन
- आजीवन : १२०० किंवा जास्त
- पंचवार्षिक ५०० किंवा जास्त
- वार्षिक १०० किंवा जास्त
- विशेष अंकाचे पुरस्कृत देणगी : मासिकाचा त्या अंकाचा प्रकाशन खर्च
आपल्या देणग्या रोख , चेक़ (At Par), डीडी (In favour of SAINIK DARPAN , Payable at Nashik 422008), पोस्टल मनी ऑर्डर स्वरुपात सैनिक दर्पण कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून सहकार्य करावे. आपण Online Banking प्रणाली द्वारे देणगी सैनिक दर्पण च्या बँक खात्यातहि आपल्या देणग्या जमा करू शकतात.
Account Name SAINIK DARPAN
Account Number 623 461 799 58
Bank Name STATE BANK OF HYDRABAD
Branch Kamathwade, Nashik (Maharashtra)
Branch Code 21196
IFS Code SBIN0021196
MICR 422002043
एक जळता दिवा सभोवतालचे परिसर प्रकाशित करतो आणि दुसरा जळता दिवा त्या प्रकाशात अधिक उजेडाची भर घालतो, त्याप्रमाणे आपल्या माजी सैनिकांनी संघटीत होवून एक प्रगतीची मशाल घेवून माजी सैनिकांनी आपली प्रगती साध्य करावी हा या मागचा हेतू होय. हे सर्व करत असताना सैनिक दर्पण टीमला या अभियानास पूर्णत्वास नेण्यासाठी वरील आजीवन देण्ग्या व्यतिरिक वेळोवेळी आपल्या आर्थिक आणि नैतिक पाठबळाची आवशकता आहे, तसेच आपला अमुल्य वेळ या पवित्र सामाजिक कामासाठी द्यावा हि अपेक्षा.
सैनिकांसाठी तळमळीने व निस्वार्थ बुद्धीने काम करण्याच्या एकाच विचाराने एकत्र येवून, माजी सैनिकांच्या संबंधात असलेली माहिती, जास्तीत जास्त सैनिकांपर्यंत पोहचवून, माजी सैनिकांचा विकास व कल्याणासाठी वाहिलेल्या मासिकाच्या उपक्रमात, मोठ्या संख्येने सहभागी होवून, सैनिकांचे शक्तिशाली, आपल्या हक्कांचे भक्कम व सक्षम व्यासपीठ करण्यासाठी, आपला खारीचा वाटा उचलून आपण सहभागी व्हावे, हि विनंती. जेणेकरून या उपक्रमातून सैनिकांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकेल. सर्व माजी सैनिकांना शुभेच्छा देवून सहकार्याच्या अपेक्षेत !!
- ब्रिगेडियर अरविंद वर्टी , वि.से. प. (निवृत्त)
सैनिक दर्पण कार्यालय पत्ता
मा संपादक , सैनिक दर्पण
११ आम्राछाया सोसायटी ITI अंबड लिंक रोड,
हनुमान मंदिराजवळ, खुटवड नगर कामाठवाडे शिवार
नाशिक महाराष्ट्र ४२२००८
sainikdarpan.blogspot.in
twitter.com/SainikDarpan
facebook.com/pages/Sainik-Darpan-Magazine
What’s App at 9422264829, 9423222985
For More details
Connect with Sainik Darpan by mail at sainik.darpan@gmail.com
or
Submit your Contact Details
No comments:
Post a Comment