Sunday 29 October 2023

पत्रकार शहाणा नव्हे तर पत्रकारिता सामान्यांना समजेल अशी हवी - ज्येष्ठ पत्रकार भाऊ

काळ्या पैशावर आधारित पत्रकारितेच्या खांद्यावर नैतिकतेचा झेंडा - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

 पत्रकार शहाणा नव्हे तर पत्रकारिता सामान्यांना समजेल अशी हवी

 

Bhau-Torsakar


मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - पत्रकारिता करताना अनुल्लेखाने न मारता विषयाला थेट भिडायचे हे मी माझ्या पत्रकारीतेची सुरुवात करताना आचार्य अत्रे यांच्या मराठा मधून व त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिकचे संपादन करताना या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांकडून शिकलोमाझ्या पत्रकारितेचा डिनए तोच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर सभागृहात काढले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून   प्रबोधनाचे कार्य केल्याबद्दल केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते भाऊ तोरसेकर यांना काकासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना सुधीर मुनगट्टीवारग्रामीण विकासमंत्री ना गिरीश महाजनमनसे सरचिटणीस संदीप देशपांडेभाजपा माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकरव्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊ तोरसेकर पुढे असेही म्हणाले कीहल्ली वृत्तपत्राचे मालक तेच संपादक असे कितीजण आहेतएखादा भांडवलदार कोट्यवधी रुपयांची मोठी भांडवली गुंतवणूक करून वर्तमानपत्र वा वाहिनी सुरु करतो आणि आपला पट्टा बांधून पत्रकाराला कामाला ठेवतोत्यामुळे डरकाळी फोडण्याऐवजी तो केविलवाणे भुंकण्याचे काम त्याच्या इशाऱ्यावर करीत असतो. मालकाचा लाभ आणि त्याचा हेतू साध्य करण्याचे एक साधन म्हणून माध्यमांचा राजरोस वापर होत असल्याने अलीकडे आजच्या पत्रकारितेची दुर्दशा झालेली आहे. काळ्या पैशाचा अधिष्ठान असलेली पत्रकारिता अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन नैतिकतेची भूमिका मांडतात हाच मोठा विनोद आहे. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍यांना किंवा लोकमतावर निवडून आलेल्यांना धमकावण्याचा उद्योग हे असे मुठभर लोक करीत होते. पण जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि सोप्या रुपात सामान्य माणसालाही आपला आवाज जगासमोर मांडण्याची तुटपुंजी का होईनासंधी मिळालीत्यातून  पत्रकारिता वा माध्यमांचे स्वरूप निरूपयोगी झाले आणि ती गरज भागवण्यासाठी सोशल मीडियाच्या रुपाने सामान्य माणूसच एकमेकांच्या मदतीला सज्ज झाला आहे. त्याला आता पत्रकारवृत्तपत्रे किंवा वाहिन्यांच्या उपकाराची वा कुबड्यांची गरज उरलेली नाही. पत्रकार शहाणा असावा असे नव्हे तर आपण जे बोलतो - लिहितो ते सामान्य माणसाला कसे समजेल हा विचार घेऊन पत्रकारितेत येणाऱ्या तरुणांनी डिजिटल मीडियाचा नकारात्मक वापर न करता सकारात्मक करावा.

ना रामदास आठवलेना. सुधीर मुनगट्टीवार,  ना गिरीश महाजन यांचीही भाऊंच्या पाच दशकांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव करणारी भाषणे झाली. पत्रकारितेने समाजातील दशा दाखविताना दिशा देण्याचे एकप्रकारे समाजाचा आरसा म्हणून काम करावे. इतर क्षेत्रातील प्रदूषण कमी करता येईल परंतु समाजा-समाजात तेढ निर्माण करणारे प्रदूषण निर्माण होणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घ्यायला हवी असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान आणि आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ऍड आरती पुरंदरे-प्रधान यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा प्रास्ताविकात मांडला. संजय भिडेविजय कोलतेऍड बिना पैअमृता रावज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका शिबानी जोशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी विसुभाऊ बापटश्रीकांत मयेकररवींद्र आवटीउमा बापटअमर तेंडुलकरऍड. समर्थ सदावर्तेरवींद्र मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदक विजय कदम यांनी केले.  राजलक्ष्मी एकसंबेकर यांनी काकासाहेब पुरंदरे यांच्यावर कविता सादर केली तर संगीता पारनेरकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

--

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४

Tuesday 24 October 2023

विजयदशमी उत्सव युगाब्द 5125 आश्विन शुद्ध दशमी नागपुर महानगर

 

Wednesday 18 October 2023

PIDPI Complaints : Vigilance Awareness Campaign 2023


GUIDELINES FOR LODGING PIDPI COMPLAINT

1. The PIDPI complaint should be in a closed/ secured envelope and should be addressed to Secretary, Central Vigilance Commission. The envelope should clearly be inscribed with “Complaint under the Public Interest Disclosure” or “PIDPI”

2. The PIDPI complainant should give his/her name and address in the beginning or end of complaint or in an attached letter. The name and address should NOT be mentioned on the envelope

3. Only complaints pertaining to employees of the Central Government or of any corporation established by or under any Central Act, Government companies, societies or local authorities owned or controlled by the Central Government fall under the jurisdiction of the Commission. Personnel employed by the State Governments and activities of the State Governments or its Corporations etc. will not come under the purview of the Commission

4. Complaints should be sent via post only. Complaints received through emails, Complaint Management Portal or any other electronic medium will not be entertained

5. In order to protect identity of the person, the Commission will not issue any acknowledgement and the whistle-blowers are advised not to enter into any further correspondence with the Commission in their own interest. The Commission assures that, subject to the facts of the case being verifiable, it will take the necessary action, as provided under the Government of India Resolution mentioned above

6. The complaints should have vigilance angle and should not be for grievance redressal

7. PIDPI complaints should not include details that identify the complainant. If the inclusion of such details is unavoidable then a normal complaint may be lodged in the CVC portal

8. Previous circulars and letters on PIDPI are available on the website of the Commission and may be referred to for further details.

Sunday 15 October 2023

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यालयासाठी धरणे-आंदोलन आमदार कालिदास कोळंबकर यांचे आश्वासन

 मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यालयासाठी धरणे-आंदोलन  आमदार कालिदास कोळंबकर यांचे आश्वासन

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यालयासाठी धरणे-आंदोलन  आमदार कालिदास कोळंबकर यांचे आश्वासन


अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन सिल केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे, २०१६ पासून सर्व पक्षीय सत्ताधारी, पालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी, पत्रव्यवहार करूनही आश्वासनापलीकडे कुणीही दाद घेत नव्हते,  त्याविरोधात दाद मागण्यासाठी मुंबई-ठाण्यातील वृत्तपत्र लेखक जुने कार्यालय असलेल्या शिंदेवाडी महापालिका शाळेसमोर एकत्र आले होते, आमदार कालिदास कोळंबकर यांनी या धरणे-आंदोलनाला तातडीने भेट दिली आणि संबंधितांशी संपर्क साधून कार्यालय पुन्हा मिळवून देतो त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्न निस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे वर्तमानपत्रातून लिहिणारी महाराष्ट्रातील ही महत्वाची वृत्तपत्र लेखक चळवळ सुरु राहण्यासाठी मी तातडीने अगोदर मुंबई मनपा आयुक्त आणि वेळ प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. यावेळी रवींद्र मालुसरे (अध्यक्ष ), प्रशांत घाडीगावकर (प्रमुख कार्यवाह), कार्यवाह नितीन कदम, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड आणि संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर, मनमोहन चोणकर, कृष्णा ब्रीद,प्रकाश बाडकर, सूर्यकांत भोसले, दिलीप ल सावंत, गुरुनाथ तिरपणकर, दिगंबर चव्हाण, विवेक तवटे, राजन देसाई,अब्बास अत्तार, चंदन तावडे, रामचंद्र जायसवाल, दिलीप दळवी, दादासाहेब येंधे,अर्जुन जाधव,प्रशांत भाटकर आदी वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.

Monday 9 October 2023

Indian Navy conducted its Annual Education Officers Enrichment Programme 2023

INDIAN NAVY CONDUCTS ENRICHMENT PROGRAMME FOR SENIOR OFFICERS OF EDUCATION BRANCH

Posted On: 09 OCT 2023 9:58AM by PIB Delhi

Indian Navy conducted its Annual Education Officers Enrichment Programme 2023 on 05 & 06 Oct 23 at New Delhi. The programme was attended by R Adm Rajvir Singh, Principal Indian Naval Academy, Commodore G Rambabu, Commodore (Naval Education) and other senior officers of Education Branch of IN. The main objective of this programme was to discuss various policy initiatives and contemporary issues related to the branch and further improve its functional effectiveness towards growth and development of IN.

As part of this programme, guest speakers from National Institute of Educational Planning and Administration (NIEPA) and Indira Gandhi National Open University (IGNOU) were invited to deliver lectures on latest developments in the field of education including Higher Education. In addition, speakers from sister services, other educational bodies and other Directorates at Naval Headquarters delivered lectures on relevant and contemporary topics. In his closing address, VAdm K Swaminathan, Chief of Personnel & Controller Personnel Services complimented recent initiatives by the Directorate of Naval Education and branch’s role in the field of education, training and welfare of Naval personnel. He exhorted the delegates to continue providing effective leadership towards moulding the branch in line with ever evolving role of the IN.

**********

VM/PS                  



(Release ID: 1965835) Visitor Counter : 153