Saturday, 15 October 2016

रशियाकडून भारतास अत्याधुनिक एस-400 ट्रायम्फ - वृत्तसंस्था

गोवा - ब्रिक्‍स परिषदेसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारतामध्ये आल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत व रशिया या दोन देशांमध्ये आज (शनिवार) दीर्घ पल्ल्याच्या "एस-400 ट्रायम्फ‘ क्षेपणास्त्र व्यवस्थेसंदर्भातील संवेदनशील करार करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. 

जगातील सध्याच्या अत्याधुनिक हवाई हल्लाविरोधी क्षेपणास्त्र व्यवस्थांपैकी एक मानल्या जात असलेल्या या व्यवस्थेद्वारे तब्बल 400 किमीच्या हवाई कक्षेत येणाऱ्या लक्ष्याचा भेद करता येणे शक्‍य आहे. या कराराची एकूण किंमत 39 हजार कोटी रुपये इतकी आहे. या नव्या क्षेपणास्त्र व्यवस्थेमुळे भारताचे संरक्षण कवच आणखी भक्कम झाल्याचे मानले जात आहे. ब्रिक्‍स परिषदेच्या औपचारिक प्रारंभापूर्वी पुतीन व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर ही अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

ही क्षेपणास्त्र व्यवस्था खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. विशेषत: उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना धडा शिकविल्यामुळे तणावग्रस्त झालेल्या भारत-पाक संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

No comments:

Post a Comment