बडोदा : केंद्राच्या उत्पन्न जाहीर योजनेंतर्गत (आयडीएस) काळा पैसा उघड करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर असून, त्या मर्यादेत जे त्यांच्याकडील काळ्या पैशांची माहिती उघड करणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘‘कुठलाही ‘सर्जिकल स्ट्राइक‘ न करता ‘आयडीएस‘ अंतर्गत सुमारे 65 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक काळा पैसा उघड करण्यात आला आहे. आम्ही जर ‘सर्जिकल स्ट्राइक‘ करू लागलो तर काय होईल.‘‘
बडोदा येथील विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटनही आज मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना मोदी यांनी भारताच्या हवाई क्षेत्राच्या विकासाबद्दल भाष्य केले. देशांतर्गत हवाई वाहतुकीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे बडोदा आणि वाराणसी या दोन्ही मदतार संघातून विजयी झाले होते. पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच बडोदा दौरा होता.
No comments:
Post a Comment