Sunday, 16 October 2016

पाककडून नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन - वृत्तसंस्था

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे पाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने राजौरी तालुक्यातील नौशेरा सेक्टरमधील चार भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. तसेच तोफगोळ्यांचाही वापर करण्यात आला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एकही जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्यानंतरही अनेकदा पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सशस्त्र सीमा दलाच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला होता.

No comments:

Post a Comment