नवी दिल्ली - प्रत्येक देशास स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याची स्पष्ट भूमिका घेत रशियाने भारताने गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्स‘चे स्वागत केले आहे. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भात भारतास रशियाकडून कायमच पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचे रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्झांडर एम कदाकिन यांनी म्हटले आहे.
""दहशतवादी भारतामधील शांतताप्रिय नागरिकांवर, तसेच लष्करावर हल्ला करतात; तेव्हा मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन होते. तेव्हा या सर्जिकल स्ट्राईक्सचे आम्ही स्वागत करतो. प्रत्येक देशास स्वसंरक्षणाचा अधिकार आहे,‘‘ असे कदाकिन म्हणाले. याचबरोबर, रशिया व पाकिस्तानमधील संयुक्त लष्करी सराव हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत नसल्याने यासंदर्भात भारताने काळजी करण्याची आवश्यकता नसल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.
यासंदर्भात गेल्या आठवड्यामध्ये, "सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील निर्णायक संघर्षास‘ रशियाचा पाठिंबा असल्याची भूमिका रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली होती.
- - वृत्तसंस्था
No comments:
Post a Comment