नवी दिल्ली, अलिकडच्या काळात दहशतवादाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करुन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले की, अपारंपारिक धोके आणि दहशतवाद ही दक्षिण पूर्व आशिया प्रांतातील प्रमुख आव्हाने आहेत. कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचा ठामपणे मुकाबला करणे, दहशतवादाचा धोरणात्मक वापर करायला बंदी तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी सांघिक सहकार्य करण्याची गरज असण्यावर त्यांनी भर दिला. ते आज नवी दिल्लीत 20 च्या आशियाई प्रांतीय मंचाच्या बैठकीत प्रमुख भाषण देत होते.
तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला चीन, जपान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, रशियासह 23 सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि संघटना सहभागी झाल्या आहेत.
PIB
No comments:
Post a Comment