Monday, 3 October 2016

आधारच्या साह्याने पेन्शन काढणे शक्य

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना आधार क्रमांकाच्या साह्याने पेन्शन फंड (पीएफ) काढणे शक्य होणार आहे.

याचा ईपीएफओच्या चार कोटी सदस्यांना थेट फायदा होणार आहे. ईपीएफओ ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणार असल्यामुळे कागदपत्रांमुळे होणारा वेळेचा अपव्यय कमी होणार आहे. शिवाय आधारशी संलग्न केल्यामुळे पेन्शन धारकांना पेन्शनची रक्कम काढणे, तसेच पेन्शनची रक्कम ठरवणे सोपी होणार आहे.

ईपीएफओने सध्या दीड कोटी सभासद आधारशी जोडुन घेतले आहेत. उर्वरित अडीच कोटी सभासदांना आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. त्यासाठी ईपीएफओचे प्रयत्‍न सुरू आहे.

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment