वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेत पाकिस्तानला दहशतावादी राष्ट्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एका खासदाराने पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत पुन्हा नव्याने धोरणे निश्चित करण्याची मागणी करत संसदेत यासंबंधिचे विधेयक संसदेत सादर केले. संसदेतील दहशतवादसंबंधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी गुरुवारी 'अविश्वसनीय सहकारी' असे शीषर्क असलेले विधेयक सादर केले.
टेड पो विधेयक सादर करताना म्हणाले की, अनेक वर्षे अमेरिकेच्या कट्टर शत्रूंची इस्लामाबादनेही मदत केली आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला आश्रय देण्यापासून ते हक्कानी नेटवर्कसोबतची जवळीक, यावरुन दहशतवादीविरोधातील लढाईत पाकिस्तान कुणाला साथ देणार हे सिद्ध होत असल्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या विश्वासघाताला सहकार्य देणे थांबवण्याची हिच योग्य वेळ आहे.
या विधेयकानुसार पाकिस्तानाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये सहकार्य दिले आहे का?, याबाबतचा अहवाल ९० दिवसांच्या आत सादर करून संसेदत मांडायचा आहे. यावर, पाकिस्तानबाबत निश्चित भूमिका ठरवण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांना 30 दिवसांनंतर पाठपुरावा करणारा अहवाल सादर करायला सांगण्यात येईल. जेणेककरुन पाकिस्तान दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र आहे, हे स्पष्टपणे मांडता येईल.
No comments:
Post a Comment