Thursday, 9 March 2017

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांविरोधात जपान व भारताची हातमिळवणी

उत्तर कोरियाने चाचणी घेतलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे असल्याचे जपान आणि भारताने म्हटले आहे. जपानच्या जिजी प्रेस या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या उपमंत्री पातळीवरच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी टोकियोत झाली. त्यावेळी उ. कोरियाची कोणतीही प्रक्षोभक कारवाई सहन न करण्याचा निश्चय दोन्ही देशांनी व्यक्त केला.

संयुक्त राष्ट्रसंघाने लागू केलेल्या मागील ठरावांची उत्तर कोरियाने अंमलबजावणी करावी, यासाठी चीनसहित आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करावेत, यावर त्यांचे एकमत झाले.

उत्तर कोरियाने सोमवारी जपानच्या समुद्रात चार आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागली होती.

ती जपानच्या ईशान्येला अकिता शहराजवळ ओगा सामुद्रधुनीजवळ पडली होती. त्यातील तीन तर जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात पडली होती.

जपानचे उप परराष्ट्रमंत्री ताकेओ अकिबा व परराष्ट्र व्यवहार खात्याचे उप संरक्षण मंत्री रो मनाबे आणि भारताचे परराष्ट्र सचिव सुब्रमण्यम जयशंकर आणि संरक्षण सचिव मोहन कुमार हे या बैठकीला हजर होते.

No comments:

Post a Comment