Saturday, 11 March 2017

पिस्तूल नको, पोलिसांना अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर द्या!

मुंबई गुन्हेगारांचा छडा लावणाऱ्या पोलिसांना  पिस्तूल नको रिव्हॉल्व्हर द्या, त्यांच्या कामाचा ताण कमी  करा असा सल्ला उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिला. गुन्हेगारांकडे असलेल्या आधुनिक शस्त्रांचा विचार करता पोलिसांकडील पिस्तूल आता जुनाट आणि इतिहासजमा झाले आहे. पोलीस खात्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे असे मत न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे  अणि न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक निखिल राणे यांची आठ वर्षांपूर्वी  नोव्हेंबर २००९ मध्ये भरदिवसा झालेल्या हत्येचा तपास करण्यास पुणे पोलीस तसेच सीआयडी पोलिसांना अपयश आल्याने  हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी करणारी याचिका राणे यांची पत्नी अश्विनी राणे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

याचिकेवर आज न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी. आर.
बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने पोलिसांच्या कामाच्या तासावर बोट ठेवले. १२-१२ तास काम करणाऱया या पोलिसांच्या कामाचे आठ तास केले पाहिजेत तसेच किमान १२वर्षांच्या सेवेनंतर त्याना बढती दिली गेली पाहिजे असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.

सामना

No comments:

Post a Comment