पुणे - हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नाही. अहिंसेत मोठी ताकद आहे, हे आम्ही केलेल्या वेगवेगळ्या काळातील आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. तरूणांनी अहिंसेचा मार्ग निवडावा, मी त्यांच्या पाठीसी उभा राहीन असे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटल आहे. ऑल बोडो स्टुडंट्स युनियन आणि सरहद्द संस्थेच्या वतीने आसाम मधील बोरोगारी या नियोजित आदर्श गावाला अण्णा हजारे यांच्या हस्ते दोन लाख रूपयाची मदत देण्यात आली. त्यावेळी हजारे बोलत होते, यावेळी सरहद्दचे संस्थापक संजय नहार, प्रमोद बोरो, गोविंद वासूमतारी, संजय शहा, प्रशांत तळणीकर त्रउपस्थित होते.
Dailyhunt
No comments:
Post a Comment