Friday, 24 March 2017

'भीम' ऍपच्या प्रसारसाठी भाजप सुरु करणार नवीन अभियान

नवी दिल्ली - भीम ऍपच्या प्रसारासाठी तसेच सामान्य नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारांसंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी भाजपकडून नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. योजनेचे स्वरूप अद्याप समजू शकले नसले तरी येत्या आंबेडकर जयंतीपासून या नवीन योजनांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे पक्षाचे कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.
अलिकडेच दिल्ली येथील भाजप मुख्यालयात पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार करत असलेले काम सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच भीम ऍप आणि कॅशलेस व्यवस्थेचे फायदे सांगत यासंबंधी लोकांमध्ये जागरुकता आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या या बैठकीनंतर कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांना सरकारचे काम सामान्य जनतेपर्यंत पोहाविण्याचे आवाहन केले आहे. तसेच येत्या आंबेडकर जयंतीला भीम ऍपच्या प्रसारासाठी नवीन योजना देखील सुरु करणार असल्याचे सांगितले.

 

Daily hunt.

No comments:

Post a Comment