नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्यात रेल्वेने 50 लाख प्रवाशांना मोफत वायफाय सेवा पुरविल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. प्रश्नोत्तर कालात राज्य सभेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्रभू म्हणाले, की देशभरातील 115 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना वायफाय सेवा पुरविण्यात येत असून लवकरच धावत्या रेल्वेगाड्यांमध्येही वायफाय सेवा पुरविण्यात येणार आहे.
सध्या 115 रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा पुरविण्यात येत असली, तरी लवकरच 400 रेल्वे स्थानकांवर ही सेवा पुरविण्यात येणार आहे. स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येनुसार यासाठी स्थानकांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वायाफाय सेवा ही सार्वजनिक सेवा असल्याने ती केवळ प्रवाशांकरता मर्यादित न ठेवता स्थानकावर येणाऱ्या सर्वांसाठी ती उपलब्ध केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये वायफाय सेवा पुरविण्यात येणार असून काही रेल्वे गाड्यांमध्ये ती सुरू करण्यात आली आहे. या बाबतीत दूरसंचार विभागाच्या मार्गदर्शनपर तत्त्वांचे पूर्ण पालन करण्यात येत असून बंदी घालण्यात आलेल्या वेबसाईटस् पाहता येणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी राज्य सभेत दिली आहे.
Dailyhunt
No comments:
Post a Comment