कोल्हापूर जम्मू-कश्मीरमध्ये सेवा बजावणाऱ्या एका जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जवानाने भ्रष्ट नेत्यांना लक्ष्य केले आहे. शत्रूबरोबर लढताना वीरमरण आल्यास आपल्या पार्थिवाला या राजकारण्यांनी स्पर्श करु नये हीच आपली शेवटची इच्छा असल्याचे म्हटले आहे. एवढ्यावरच हा जवान थांबला नसून त्याने आपल्या गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्जही लावले आहेत. रणजीत गावडे असे या जवानाचे नाव असून तो कोल्हापूरचा आहे. लष्करात लान्स नायक या पदावर तो कार्यरत आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद होत असल्याने व्यथित झालेल्या रणजीतने व्हिडिओ आणि होर्डिग्जच्या माध्यामातून आपले मनोगत व्यक्त केले आहे.
त्याने चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्ज लावले आहे. जर सेवा बजावताना मला वीरमरण आले तर नीतीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेते आणि लाचखोर अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये. हीच माझी शेवटची इच्छा आहे. तसेच या भ्रष्ट नेत्यांविरोधात नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन या जवानाने होर्डिंग्जमधून केले आहे.
सामना
No comments:
Post a Comment