बिजिंग - चीन राखीव सैनिक दलाचे पुनर्गठन करून त्यांना युद्धासाठी सज्ज ठेवण्याच्या उद्देशाने थलसेनातील 23 लाख सैनिकांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात करून अन्य दलातील सैनिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. चीनच्या या योजनेंतर्गत थलसेनातील तीन लाख सैनिकांची कपात करण्यात येणार आहे.
चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या नॅशनल डिफेंस मोबिलायझेशन विभागाचे प्रमुख शेंग बिन यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठे सैन्य दल हे चिनचे मानले जाते. या सैन्य दलातील सैनिकांची संख्या कमी करून त्यांना अन्य सुविधा पुरविण्यात येणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थलसेनातील सैनिकांची संख्या कमी करण्यात येणार असून त्या ऐवजी नौसेना, वायुसेना आणि रॉकेट फोर्समधील सैनिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
तसेच चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी 2015मध्ये तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप किती सैनिकांची कपात करण्यात येणार आहे, याबाबत निश्चित आकडा समजू शकलेला नाही.
Dailyhunt
No comments:
Post a Comment