नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरी यांचा कीर्तीचक्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे लेफ्टनंट जनरल सुपुत्र राजेंद्र निंभोरकर यांचाही गौरव केला.
देशातील दुसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरींना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मेजर सुरी यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले. तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तर युद्ध सेवेचे मेडल प्रदान करण्यात आहे आहे.
दहशतवाद्यांना पठाणकोट हल्ल्यात सडेतोड उत्तर दिलेले भारतीय वायूसेनेचे अधिकारी गुरसेवक सिंह यांना मरणोत्तर शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत पार पडला.
No comments:
Post a Comment