Thursday, 16 March 2017

दत्तक मूल घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांची मातृत्व रजा दुप्पट

मुंबई, दि. 16 - वय एक वर्षापेक्षा कमी असलेलं मूल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या मातृत्व रजेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील मूल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांची विशेष रजा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रसुती रजेप्रमाणेच 180 दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणार्‍या केंद्रीय कर्मचारी महिलेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारमधील कर्मचारी महिलांबाबतही अर्थ मंत्रालयाने हाच निर्णय घेतला आहे. मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून ही रजा लागू होईल.
महत्त्वाचं म्हणजे, एक वर्षापर्यंतचं मूल दत्तक घेतलेल्या ज्या महिला कर्मचारी सध्या 90 दिवसांच्या विशेष रजेवर आहेत, त्यांनाही आता 180 दिवसांपर्यंत विशेष  रजा लागू होईल.

दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचार्‍यांना 180 दिवसांची विशेष रजा लागू राहील. एक अपत्य हयात असलेल्या कर्मचारी महिलेने ही  विशेष रजा घेतल्यानंतर दत्तक मुलासाठी किंवा सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहाणार नाही.
विशेष रजेसाठी संबंधित महिला कर्मचार्‍यांना सेवा कालावधीची अट नसेल. मात्र ज्या महिला कर्मचार्‍यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झालेली आहे, त्यांनी अर्ज  करताना त्यांच्या कार्यालयाला बाँड द्यावा लागेल.
त्यानुसार विशेष रजेवरुन परतल्यानंतर दोन वर्षे सेवेत राहणं अनिवार्य असेल. राजीनामा द्यायचा असेल, तर  तिला विशेष रजा कालावधीतील वेतनाइतके वेतन राज्य शासनाला द्यावं लागेल.

Dailyhunt

No comments:

Post a Comment