नवी दिल्ली :सावधान तुमचे नाव, फोटो, जन्म तारीख, बँक खाते क्रमांक अशी आधार कार्डशी संबंधित असलेली तुमची वैयक्तिक माहिती गूगलवर लीक होत आहे. हे कोणा हॅकरच काम नसून सरकारच्या एका वेबसाईटवरुनच ही माहिती जगजाहीर होत असल्याच समोर आल आहे. एका ट्विवटर युझरने ही बाब निदर्शनास आणून दिली असून या माहितीच्या आधारे आधार कार्डचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशाराही त्याने दिला आहे. विशेष म्हणजे आधार कार्डच्या वेबसाईटवरुन ही माहिती लीक होत नाही, तर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गूगलवर ही माहिती डाऊनलोड करता येत आहे. सरकारच्या अनेक योजनांसाठी आधार कार्ड जोडणे आवश्यक असते. यामुळे विविध मंत्रालयांच्या वेबसाईटवरही आधारकार्डशी संबंधित ही माहीती उपलब्ध असते.
आधार कायदा २०१६ नुसार आधारसाठी देण्यात आलेला व्यक्तीचा डेटा सार्वजनिक होता कामा नये. पण तरीही ही माहिती लीक झाल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. ‘दी वायर’ने दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी डेटा रिसर्चर श्रीनिवास कोडाली यांनी एका वेबसाईटवरुन ५-६ लाख नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे सांगितले होते. यात नागरिकांचे फोटो, आधार क्रमांक, जात, लिंग अशी माहिती होती, असे ते म्हणाले होते.
पण त्याची कोणी दखल घेतली नव्हती.
सामना
No comments:
Post a Comment