Saturday, 18 March 2017

पाक पंतप्रधान शरीफ गायत्रीमंत्रात झाले तल्लीन

शरीफ यांनी हिंदूंच्या सणाला उपस्थिती लावत गायत्री मंत्राला दाद दिल्याने पाकिस्तानसह भारतात या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली/कराची : पाकिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदूंनी होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आवर्जून उपस्थिती लावली. एका युवतीने केलेल्या गायत्री मंत्राच्या गायनाला त्यांनी टाळ्या वाजवून दिली.

शरीफ यांनी हिंदूंच्या सणाला उपस्थिती लावत गायत्री मंत्राला दाद दिल्याने पाकिस्तानसह भारतात या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानातील हिंदू समुदायाने होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. कराचीमध्ये शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नरोधा मालिनी या तरुणीने आपल्या सुरेल आवाजात गायत्री मंत्राचे पठण करीत उपस्थितांची मने जिंकली.
मुस्लिम स्त्रिया व पुरुषांनी तल्लीन होऊन ऐकत असल्याचे या
व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. शरीफ यांनी लक्ष देऊन तिचे गायन ऐकले आणि शेवटी टाळ्या वाजवून तिला दाद दिली.

शरीफ म्हणाले, "कोणताही संकोच न बाळगता कराचीच्या प्रत्येक भागात होळी साजरी करण्यात येत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. पाकिस्तानात ठराविक धर्म स्वीकारण्यासाठी कोणीही इतरांना जबरदस्ती करू शकत नाही."

'हॅप्पी होली' म्हणत शरीफ अल्पसंख्यांकाना सर्वसमावेशक संदेश दिला.

सकाळ

No comments:

Post a Comment