कामगारांनी संघटीत झालेपाहिजेः संसारे
पॉइंटर - न्याय हक्कासाठी लढा द्यावा- शेख
राहुरी फॅक्टरी - राहुरी तालुक्यातील देवळालीप्रवरा येथेगुरुवारी जिल्हा शेतमजूर संघटनेच्या वतीनेशहिद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. शरद संसारे, माजी सैनिक शरद चव्हाण, प्रभाकर महांकाळ, याकुब शेख, विलास उंडे, याकुब शेख, दिलीप गुलदगड, बी. डी. खंडागळे यांच्या हस्ते भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शेतमजूर संघटनेचेज्येष्ठ नेते लहानू जाधव होते. 23 मार्चला क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु शहिद झाले होते.
त्यांना शहिद दिनी अभिवादन करण्यात येते.
शरद संसारे म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व संघटीत झाल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळूशकले. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 वर्षे पूर्ण झाली तरी ही मुलभूत प्रश्नांसाठी शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी संघटीत होऊ शकलेले नाहीत. स्वत:चा आणि कुटुंबाचा रोजगाराच्या दृष्टीने, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करायचा असेल तर संघटीत झाले पाहिजे.
शेतमजूर संघटनेच्या मदिना शेख म्हणाल्या, आपण शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श घेऊन न्याय हक्कासाठी लढा दिला तरच आपण शहिददिनी अभिवादन करण्यास पात्र ठरू. लक्ष्मण वाघ, रंगनाथ दुशिंग, बाबुलाल पठाण, ज्ञानेश्वर जाधव, हसन शेख, शकील सय्यद, सुभद्रा जाधव, हमीदा शेख, सुन्नाबी शेख, आशा माळी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment