धुळे, दि. 12 - पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर धुळ्यात परतला आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः त्याला घेऊन धुळ्यात परतले. बोरविहिर या आपल्या गावी आल्यानंतर चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले.
मृत आजीच्या आठवणीने चंदू चव्हाणचे डोळे पानावले. अगोदर आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार असल्याचं त्याने सांगितलं. चंदू जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार नाही, असं चंदूच्या भावाने सांगितलं होतं. चंदू पाकच्या तावडीत गेल्याचं वृत्त कळताच आजीचं धक्क्यानं निधन झालं होतं. बोरविहिर गावातील महिलांचे चंदूला पाहून डोळे पानावले. धुळ्यात पोहचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नमन करुन चंदू गावी रवाना झाला.
त्यापूर्वी धुळ्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Dailyhunt
No comments:
Post a Comment