Wednesday, 8 March 2017

आता आधार पे अॅपने करा कॅशलेश व्यवहार

नवी दिल्ली, दि. 8 - सध्या देशभरात डिजिटल व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून सर्वत्र डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करत केंद्र सरकारने 'आधार पे अॅप'साठी पुढाकार घेतला. या पार्श्वभूमीवर, खासगी बँकींग क्षेत्रातील IDFC बँकेने पहिलं 'आधार पे अॅप' लाँच केलं आहे. 'आधार पे अॅप'द्वारे ज्यांच्याकडे स्मार्टफोन देखील नाही, अशा व्यक्तीही कॅशलेस व्यवहार करू शकतात, हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे.

जाणूया घेऊन 'आधार पे अॅप'ची वैशिष्ट्ये

क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड शुल्कापासून सुटका

आधार पे स्मार्टफोन पेमेंट अॅपचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे व्यापारी सवलत दर (Merchant Discount Rate) द्यावा लागणार नाही.

MDR म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्डची सुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात बँकांकडून जोर सेवाकर लावला जातो त्याला MDR असे म्हणतात.

स्मार्टफोनविना कॅशलेस व्यवहार

एखादा व्यापारी किंवा दुकानदार मोबाइलशिवायदेखील पैसे भरण्यासाठी या अॅपचा वापर करू शकतो. कारण या अॅपद्वारे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी मोबाइलची आवश्यकता नाही.

पासवर्ड

अॅप पासवर्डसाठी बायोमीट्रिक स्कॅनचा वापर करावा लागतो. म्हणजे पैशांचा व्यवहार करण्यासाठी बोटांचे ठसे किंवा बायोमीट्रिक डेटा प्रमाणित केला जाणार आहे. त्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही.

बँक खात्यासोबत आधार कार्ड क्रमांक जोडणे गरजेचं

युजर्सच्या बँक खात्यांसोबत आधार कार्ड क्रमांक जोडलेला असणे गरजेचं आहे. कारण आधार कार्ड क्रमांक जोडल्यानंतरच अॅपद्वारे कॅशलेस व्यवहार होऊ शकणार आहे.

अॅप असं करणार काम

गुगल प्ले स्टोअरमधून आधार पे अॅप डाऊनलोड करावे. बायोमेट्रीक स्कॅनरद्वारे अॅप लिंक जोडावी. पैशांचा व्यवहार करण्यासाठी केवळ आपला आधार कार्डवरील क्रमांक अॅपमध्ये सबमिट करावा. ज्यात बँक खातं आहे तो पर्याय निवडून व्यवहार करावा. त्यानंतर बायोमीट्रिक स्कॅनर बोटांचे ठसे स्कॅन करुन सत्यता पडताळून पाहणार.

अॅप केवळ अँड्रॉइडवर उपलब्ध

सध्या हे अॅप केवळ अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे.

इंटरनेटशिवाय काम अशक्य

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांत आधार पे अॅपचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणंही गरजेचे आहे. याद्वारेच युजर्सच्या बायोमीट्रिक डेटाची पडताळणी होऊ शकते.

फंड ट्रान्सफर होणार नाही

कॅशलेस व्यवहारासाठीच या अॅपचा वापर केला जाऊ शकतो. याद्वारे कोणत्याही प्रकारचा फंड ट्रान्सफर करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही.

10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची मर्यादा

सध्या आधार पे अॅपद्वारे जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणं शक्य आहे.

NPCI सोबत मिळून विकसित केला अॅप

IDFC बँकेचा आधार पे पेमेंट अॅप UIDAI आणि NPCI (National Payments Corporation Of India) यांच्या संयुक्त विद्यमाने अॅप विकसित करण्यात आला आहे.

लोकमत

No comments:

Post a Comment