Monday, 18 February 2019

Pulwama encounter :चकमकीत मेजरसह ५ जवान शहीद


पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवानांना वीरमरण आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 18, 2019, 09:16AM IST

Pulwama encounter :चकमकीत मेजरसह ५ जवान शहीद

काश्मीर

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

ANI

@ANI

Jammu & Kashmir: 4 Army personnel including a Major killed in action, 1 injured during encounter between terrorists and security forces in Pinglan area of Pulwama district in South Kashmir

ANI

@ANI

Jammu & Kashmir: 4 Army personnel killed in action, 1 injured during encounter between terrorists and security forces in Pinglan area of Pulwama district in South Kashmir.


241

8:36 AM - Feb 18, 2019

Twitter Ads info and privacy

230 people are talking about this

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या ५५ राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह ५ भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे.
मात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे.
भारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याच आली आहे.
चारच दिवसांपूर्वी, १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment