Sunday 17 February 2019

७ मार्चला होते लग्न, मात्र त्याआधीच झाला शहीद !


टीम महाराष्ट्रा देशा – नौशेरा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या परिसरात घातपात करण्यासाठी दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब पेरले होते. दहशतवाद्यांनी बॉम्ब लावल्याचे समजताच मेजर चित्रेश सिंग यांच्या पथकासह बॉम्ब निकामी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी एक बॉम्ब निकामी केला. मात्र दुसरा बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट होऊन चित्रेश यांचा मृत्यू झाला.

नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात लष्कराचा एक अधिकारी शहीद काल झाला आहे. मेजर चित्रेश सिंग बिस्ट (31) असे त्यांचे नाव आहे . येणाऱ्या 7 मार्च त्या अधिकाऱ्याचे लग्न होणार होते. चित्रेश यांचे वडील मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटत असता मुलगा शहीद झाल्याची बातमी त्यांना समजली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चित्रेश यांना लग्नाअगोदर अकस्मात वीरमरण आल्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शहीद चित्रेश यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेजर चित्रेश सिंग हे मूळचे उत्तराखंडमधील डेहराडून येथील असून त्यांचे वडील एस. एस. बिष्ट हे उत्तराखंडमध्ये पोलीस निरीक्षक आहेत. सैन्यदलात अधिकारी पदावर असलेल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला वडील जोमाने लागले होते. ते नातेवाईकांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देत असतानाच शनिवारी त्यांना आपला मुलगा दहशतवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटात शहीद झाल्याची बातमी आली. 28 फेब्रुवारीपासून चित्रेश लग्नासाठी सुट्टीवर येणार होते. शहीद चित्रेश बिस्ट यांचे पार्थिव रविवारी देहरादूनला येण्याची शक्यता आहे.

दरम्यान,पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. ‘भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची मागणी यावेळी संतप्त तरुणांनी केली आहे.’

पहा व्हिडीओ –

https://www.youtube.com/watch?v=TchJx8a_ZG0&t=2s

No comments:

Post a Comment