पोखरण - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने शनिवारी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन घडवले. दरम्यान, राजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज असल्याची ग्वाही हवाई दल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी दिली.
राजस्थानच्या पोखरणमध्ये हवाई दलाच्या वायूशक्ती या भव्य कवायतींचे उद्घाटन करताना धनोआ यांनी देशाला हवाई दलाच्या ताकदीची ग्वाही देशाला दिली. राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यास आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. कुठलीही मोहीम तडीस नेण्यासाठी आम्ही आघाडीवर राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामात घडवलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी भारतीय सुरक्षा दलांकडून केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, धनोआ यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. दरम्यान, वायूशक्तीच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान सीमेलगत आपल्या शक्तीचे दर्शन घडवले. संबंधित कवायतींमध्ये लढाऊ जातीच्या सुमारे 140 विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी भाग घेतला. यावेळी क्षेपणास्त्रांच्या ताकदीचेही प्रदर्शन घडवण्यात आले.
No comments:
Post a Comment