Sunday, 17 February 2019

हा नवा भारत! येथे ना बॉम्ब फेकणारा वाचेल, ना बॉम्ब पुरवणारा : मोदी


यवतमाळ : पुलवामा येथे गुरुवारी राखीव सुरक्षा दलावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली असून या दहशतवादी हल्ल्यास जशास तसे प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना सर्वाधिकार प्राप्त करण्यात आले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत समाजातील सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून या पाकिस्तान पुरस्कृत हल्ल्यास जशास तसे उत्तर देण्याची मागणी देशभरामधून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील यवतमाळ येथे विकासकामांच्या उदघाटनांसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, 'हा नवा भारत आहे, या नव्या भारतामध्ये बंदूक चालवणारा असो की हाती बंदूक देणारा, बॉम्ब फेकणारा असो की बॉम्ब पुरवणारा, आमचे शूर सैनिक या सर्वांनाच पळता भुई थोडी करतील. या नव्या भारताची झलक संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे.'

भारत नई नीति और नई रीति का देश है। ये अब दुनिया भी अनुभव करेगी।

बंदूक चलाने वाला हो या बंदूक पकड़ाने वाला, बम दागने वाला या बम देने वाला, हमारे बहादुर सुरक्षा बल किसी को चैन से सोने नहीं देंगे : पीएम श्री नरेन्द्र मोदी pic.twitter.com/b3lu8gkB3e

No comments:

Post a Comment