Monday, 18 February 2019

पुलवामा हल्ला एकट्यादुकट्याचे काम नव्हे: माजी रॉ प्रमुख


जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे. या हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत आहे, अशी शक्यता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 17, 2019, 09:33PM IST

पुलवामा हल्ला एकट्यादुकट्याचे काम नव्हे: माजी रॉ प्रमुख

हायलाइट्स

  • सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे: रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद
  • हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता : सूद
  • सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत : सूद
  • पाकिस्तान आणि चीन एकमेकांचा फायदा पाहत आहेत. पाकिस्तानला पाठिंबा दिला तर पाकिस्तान चीनसाठी शिनजियांगमध्ये अडचणी निर्माण करणार नाही, हे चीनला पक्कं ठाऊक आहे: सूद

हैदराबाद:

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे. या हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत आहे, अशी शक्यता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केली.
भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) मध्ये सूद यांनी तब्बल ३१ वर्षे सेवा केली. 'एक्स्टर्नल इंटेलिजन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी' या विषयावरील एका कार्यशाळेत ते बोलत होते. 'सुरक्षा व्यवस्थेत कुठेतरी उणीव असल्याशिवाय एवढी मोठी घटना घडू शकत नाही. सीआरपीएफच्या जवानांच्या गाड्यांच्या हालचालीची संपूर्ण माहिती कोणीतरी दहशतवाद्यांना पुरवली. यामागे मोठा गट कार्यरत असण्याची शक्यता आहे,' असे ते म्हणाले.
भारताने या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायला हवे, असे विचारता ते म्हणाले, 'ही कुठली बॉक्सिंगची मॅच नव्हे की ठोशास ठोसा लगावावा. पंतप्रधानांनी याबाबत सांगितले आहे की योग्य वेळ आणि ठिकाण सुरक्षा दल ठरवेल.' पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी ते म्हणाले की 'चीन पाकिस्तानच्या सांगण्यावरून अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या आड येत आहे. कारण तसे न केल्यास शिनजियांग प्रांतातल्या इस्लामिक संघटना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संपर्क करू शकतात. पाकिस्तान आणि चीन एकमेकांचा फायदा पाहत आहेत. पाकिस्तानला पाठिंबा दिला तर पाकिस्तान चीनसाठी शिनजियांगमध्ये अडचणी निर्माण करणार नाही, हे चीनला पक्कं ठाऊक आहे.'

No comments:

Post a Comment