Sunday, 17 February 2019

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारने सैन्याला दिली परवानगी

टीम महाराष्ट्र देशा – ‘सुरक्षा दलांना पुढील कारवाई करण्यासाठी वेळ काय असेल, जागा आणि स्वरुप काय असेल हे निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अशा प्रकारचे हल्ले करून भारताला उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पण त्यांचे हे मनसुबे देशातील १३० कोटी जनता एकत्रितपणे उधळून लावेल. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

काल दुपारी ३:२५ वाजता जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

झाशीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या सैनिकांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे . त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी नरेंद्र मोदींनी देशाला ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment