पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा माजी सैनिकांसह लष्करी जवानांच्या कुटुंबीयांकडूनही तीव्र निषेध करण्यात आला. सरकारने पाकिस्तानला मोठा धडा शिकवावा, तसेच फुटीरतावाद्यांनाही हद्दपार करावे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व देश आता उभा आहे असाच कायम राहावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स | Updated:Feb 16, 2019, 04:00AM IST
पाकला धडा शिकवाच; नाशिकमध्ये संतप्त प्रतिक्रिया
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा माजी सैनिकांसह लष्करी जवानांच्या कुटुंबीयांकडूनही तीव्र निषेध करण्यात आला. सरकारने पाकिस्तानला मोठा धडा शिकवावा, तसेच फुटीरतावाद्यांनाही हद्दपार करावे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व देश आता उभा आहे असाच कायम राहावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
भारताला कुणीही कमी समजू नये. आता जोरदार प्रतिउत्तर आवश्यक आहे. युद्ध हा सक्षम पर्याय नसला तरी पाकचे नाक दाबायला हवे. त्यांचे पाणी बंद केले तर ते कासावीस होतील. त्यांना अद्दल घडविणे आवश्यक आहे.
- फुलचंद पाटील, अध्यक्ष, माजी सैनिक संघटना
दहशतवाद्यांचा हल्ला म्हणजे मोठा कट आहे. सर्वजण सरकारच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सरकारने मोठा धडा शिकवावा. आता नाही तर कधीच नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
- विजय पवार, उपाध्यक्ष, माजी सैनिक संघटना
सरकारने तातडीने कारवाई करावी आणि फुटीरतावाद्यांचाही चोख बंदोबस्त करावा. एवढा मोठा हल्ला आजवर झाला नाही. त्यांची हिंमत कशी होते. त्यामुळे दहशतवादाचा नायनाट करणे हेच प्रथम ध्येय हवे.
- प्रभाकर भगत, मेजर (निवृत्त)
आपला देश कधीही कुणावर हल्ला करीत नाही. मात्र, दहशतवादी त्याचाच फायदा घेत आहेत. त्यांना नष्ट करणे आवश्यक आहे. जवान रक्षणासाठी सक्षम आहेत. सरकारने त्यांना संधी द्यावी ते त्याचे नक्कीच सोने करतील.
- सुरेखा सोनवणे, वीरपत्नी
आपण सर्वांनी शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहणे आवश्यक आहे. असा हल्ला पुन्हा घडू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. आपण सर्वांनी नैतिकतेचेही सैनिक होणे गरजेचे आहे.
- सुमेधा चिथडे, सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन
इतका मोठा हल्ला आजवर झाला नाही. अतिशय दुर्देवी बाब आहे. शहिदाच्या प्रत्येक कुटुंबियांचे दु:ख अपार आहे. आपल्या देशाने सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे. गरज पडली तर आम्ही माजी सैनिकही लढण्यासाठी जाऊ.
- निर्मला पवार, अध्यक्ष, माजी सैनिक महिला आघाडी
नागरिक म्हणतात....
देश शहिद कुटुंबियांच्या पाठिशी
देश एका गंभीर घटनेतून जात आहे. त्यामुळे देशवासियांनी एक दिलाने सरकारच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे.
- विनायकदादा पाटील, माजी मंत्री
…
सर्वांनी संयमाने परिस्थिती हाताळून जातीय सलोखा कायम ठेवण्याची गरज आहे. या घटनेचे प्रतिउत्तर आवश्यक द्यावे.
- विश्वास ठाकूर, बॅँक संचालक
…
एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाका. भारतीय हद्दीत अनेक ठिकाणांवर पाकने हल्ले करूनही भारताची भूमिका मात्र निषेधाची राहिली आहे.
- रवींद्र गारे, व्यावसायिक
…
पुलवामामध्ये झालेल्या प्रकाराचा मुस्लिम समाज निषेध करतो आहे. इस्लामध्ये विद्ध्वंसक कृत्याला स्थान नाही. ज्या कुणी ही कृत्य केले असेल अशा व्यक्तीला सजा व्हायला पाहिजे.
- हाजी मौलान सय्यद नदीम, लेक्चर नॅशनल हायस्कूल
…
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व राष्ट्रांना पाकची काळी कृत्ये समजली आहेत. त्यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध संपुष्टात आणून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केली पाहिजे. सर्वच क्षेत्रातील गद्दारांना धडा शिकवावा.
- अशोक नवले, निवृत्त राज्य कर्मचारी
…
पृथ्वी, अग्नि मिसाईल, अर्जुन टँक, सुखोई विमान, ब्रह्मोस, अरिहंत, विक्रमादित्य सारख्या हत्यारांचा फक्त २६ जानेवारीच्या परेडमध्ये उपयोग होऊ नये. आता याचा उपयोग करण्याची गरज आहे. पाकचा ताबडतोब बदला घ्यावा.
- स्नेहल देव
No comments:
Post a Comment