Sunday 17 February 2019

पुलवामा : तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे - विश्वास नांगरे पाटील


टीम महाराष्ट्र देशा – देशातील सुरक्षा जवानांवर झालेला झालेला हल्ला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण सर्वजन सहभागी आहोत. शत्रूवर आक्रमण आणि भारतीय शहिदांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील सीआरपीएफच्या शहीद जवानांना कोरेगावच्या डी. पी. भोसले महाविद्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत होते. या वेळी नांगरे पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते अमर जवान स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. ले. बाळकृष्ण भोसले, कोरेगाव शहरातील सोनेरी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, छात्रसेनेचे कॅडेट व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. डॉ. विद्या नावडकर यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment