Thursday, 22 September 2016

पाकिस्तान हा दहशतवादी देश- भारताने सुनावले

संयुक्त राष्ट्रे- आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये रस्त्यांवर राजरोसपणे फिरत असून, पाकच्या शासकीय मदतीने दहशतवादी कारवाया करीत आहेत, असे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणून दिले.

पाकिस्तान हा ‘दहशतवादी देश‘ असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे दीर्घकाळापासूनचे धोरण आहे. या धोरणानेच ते भारताविरुद्ध युद्ध कारवाया करीत असल्याचे भारताने स्पष्टपणे सांगितले. काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय पाक चर्चा करणार नाही अशा आशयाचे वक्तव्य केले आहे.

संयुक्त राष्ट्रामध्ये नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्यावरून भारतावरच मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्ये सडेतोड उत्तर दिले आहे. दहशतवाद हे तुमचे सरकारी धोरण असल्यासारखा तुम्ही वापर करता. त्या युद्ध कारवाया ठरतात. दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानच्या धोरणाचे परिणाम भारत आणि अन्य शेजारी देशांना भोगावे लागत आहेत. अनेक देश सध्या या धोरणामुळे त्रासलेले आहेत.

भारताने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदतीच्या रुपाने मिळणाऱ्या अब्जावधी डॉलरचा निधी पाकिस्तान दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना खतपाणी घालण्यासाठी वापरतो. त्यामुळे भारताच्या दृष्टीने पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे.

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment