जम्मू - उरीतील हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलांना (बीएसएफ) जम्मूतील 198 किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर "हाय ऍलर्ट‘ देण्यात आलेला आहे. त्यांना अतिदक्ष राहण्यासाठी सांगितले आहे.
बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की सीमेवर रक्षण करणारे सीमेपलीकडील घडामोडींवर डोळ्यांत तेल टाकून लक्ष ठेवून आहेत. चोवीस तास ते अतिदक्ष आहेत. या जवानांकडे आधुनिक टेहळणी यंत्रणा देण्यात आलेली आहे. सीमेवर तिहेरी कुंपण असून, तेथे प्रकाशझोतदेखील बसविण्यात आले आहेत.‘‘
जम्मू, सांबा तसेच कथुआ या भागात सीमेवर दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त या अधिकाऱ्याने फेटाळून लावले. तसेच पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग झाल्याचेही त्यांनी फेटाळले. वीस ते तीस दहशशतवादी नेहमी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असतात. काळजी करण्यासारख्या कोणत्याही हालचाली सध्या सीमेवर नाहीत. या दहशतवद्यांना नेहमी एका टिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर हलविले जाते. जेणेकरून त्यांना घुसखोरी करता येऊ शकेल.
PTI
No comments:
Post a Comment