Saturday, 24 September 2016

'आयफोन-7' खरेदी करणाऱ्यांनी नोकरी सोडावी!

बीजिंग - ‘जे कर्मचारी आयफोन 7 खरेदी करतील त्यांनी आपली नोकरी सोडावी‘ असे आदेश मध्य चीनमधील हेनान प्रांतातील एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.

याबाबत चीनमधील एका दैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. संबंधित कंपनीच्या प्रशासन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जे लोक आयफोन खरेदी करतात ते देशभक्त नाहीत असे कंपनीने म्हटले आहे. "जे चीनी लोक "ह्युवैई‘च्या (कंपनी) ऐवजी "आयफोन 7‘ खरेदी करतात ते देशभक्त नाहीत‘, असेही कंपनीने सांगितले आहे. दरम्यान ही बातमी चीनमध्ये व्हायरल झाली आहे. वास्तविक चीन आणि अमेरिका या स्वतंत्र अर्थव्यवस्था आहेत. बहुतेक आयफोनची निर्मिती ही चीनमध्ये होते. जर अशा खरेदीला बंदी आणली तर चीनमधील उद्योगांचे आणि कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

No comments:

Post a Comment