Saturday 24 September 2016

नाशिकमध्ये घोंगावले मराठा वादळ (व्हिडिओ) - संपत देवगिरे

नाशिक - आज (शनिवार) सकाळी तपोवन येथून मराठा क्रांती मोर्चाची सकाळी साडेदहाला सुरवात झाली. मात्र, त्याआधीच येथे लाखोंची उत्साही गर्दी उपस्थित दिसून आली. मोर्चासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून लाखो लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे मोर्चा सुरु होतानाच शहराकडे जाणारे सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी भरून गेले होते. या मोर्चाला संयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी झाली. त्यामुळे गतवर्षी झालेल्या कुंभमोळ्याच्या पार्श्वभूमीवरू आज नाशिकमध्ये मराठा समाज बांधवांचा मूक महाकुंभमेळा भरला होता.

https://youtu.be/lnmVRvswUxA

अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ व त्यातील आरोपींना फाशी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा झाला. या मोर्चात जिल्ह्याच्या सर्व भागातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. सकाळी साडेदहाला पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अण्णा भाऊ साठेंचा पुतळ्यास विद्यार्थिनींनी पुष्पहार घातला. त्यानंतर तपोवन येथून निघालेला हा मोर्चा पुतळ्यांच्या ठिकाणी थांबून जय जिजाऊ, शिवाजी महाराज की जय या संयमी घोषणा देऊन पुढे गेला. मोर्चा समारोपाचे नियोजित गोल्फ क्लब येथे पोहचण्याआधीच या संबंध परिसराला लाखो मोर्चेकऱ्यांचा गराडा पडला होता. मैदानात केवळ विद्यार्थिनी आणि महिलांनाच प्रवेश होता. तरीही ती जागा अपुरी पडली. यानंतर पाच प्रतिनिधिक मुली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. व्यासपीठावर प्रतिनिधिक अकरा विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यांनी मागण्यांचे वाचन केले.

https://youtu.be/Dp1oFYJ0I4c

या मोर्चासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. अग्रभागी मुली, त्यानंतर विद्यार्थिनी, महिला, व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिक होते. सर्वांत शेवटी राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. यामध्ये मोर्चाच्या संयोजिका निलिमाताई पवार यांसह असंख्य नेते उपस्थित होते.

- सकाळ वृत्तसेवा

शनिवार, 24 सप्टेंबर 2016 - 11:18 AM IST

No comments:

Post a Comment