नवी दिल्ली - उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विनोदी कलाकार राजू श्रीवास्तवने पाकिस्तानमधील कराची येथील कार्यक्रम रद्द केला.
राजू श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "आम्ही बंदुका घेऊन सीमेवर जाऊ शकत नाहीत. मी माझा कराचीतील कार्यक्रम रद्द करून निषेध व्यक्त करणे ही माझी एक पद्धत आहे.‘ तसेच "विनोद हा आतून येत असतो. जड अंत:करणाने मी आपली कला सादर करू शकत नाही‘, असेही राजूने पुढे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना भारत तातडीने सोडण्याचा फतवा काढला आहे. हे कलाकार जर देश सोडून गेले नाही तर त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण थांबविण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. पाकिस्तानी कलाकारांमुळे भारतीय कलाकारांची संधी हिरावून घेतली जात असल्याचा आरोप मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
- - वृत्तसंस्था
No comments:
Post a Comment