Sunday 12 March 2017

ब्रम्होसची यशस्वी चाचणी, क्षेपणास्त्राच्या क्षमतेत वाढ

भारताचं ब्रम्हास्त्र असलेल्या ब्रम्होस सुपसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्यावर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ब्रम्होसच्या मारक क्षमतेत वाढ केल्यानंतर ही पहिलीच चाचणी यशस्वी झाल्यानं आता पाकड्यांचा आणि चीनचा तिळपापड झाला आहे. ब्रम्होसमध्ये बदल केल्यानंतर याची मारक क्षमता २९० कि.मी. वरुन वाढून ४५० कि.मी. झाली आहे. चीन आणि पाकड्यांची या चाचणीवर बारकाईनं नजर होती, कारण अनेक देश हे रडारलाही चकवा देणाऱ्या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं आहे.

ब्रम्होसमुळे एमटीसीआरमध्ये हिंदुस्थानचा समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रम्होसची मारक क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रम्होसची मारक क्षमता वाढवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. येत्या २ ते ३ वर्षात ब्रम्होसची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यत वाढवण्यात येणार असल्याचे डीआरडीओचे प्रमुख एस. क्रिस्टोफर यांनी सांगितले.

ब्रम्होस क्षेपणास्त्र हिंदुस्थान आणि रशियानं एकत्रीतपणे तयार केलं आहे. हे क्षेपणास्त्र जमीन, हवा, समुद्र आणि पाण्याखालूनही प्रक्षेपित करता येतं. ब्रम्होसचं खास वैशिष्ट्य म्हणजे रडारलाही चकवा देत अतिशय वेगानं आपल्या लक्ष्याचा वेध घेणे आणि त्याचा विध्वंस करणे हा आहे.

सामना

No comments:

Post a Comment