श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संघटना अर्थात 'इस्रो'चे पुढील लक्ष्य शुक्र ग्रह असणार आहे; अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी दिली. शुक्र मोहिमेसाठी सरकारला सादर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
इस्रो शुक्र ग्रह, मंगळ आर्बिटर मिशन - २ आणि उपग्रहांच्या मोहिमा हाती घेण्याबद्दल विचार करीत आहे. या मोहिमांची पूर्वतयारी केली जात आहे. शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या संशोधन मोहिमांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली असल्याची माहिती किरण कुमार यांनी दिली. या मोहिमांचे उद्दीष्ट काय आहे; या मोहिमेत कोणत्या उपकरणांचा वापर केला जाणार आहे; या मोहिमांसाठी किती खर्च येणार आहे; याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असल्याचे ते म्हणाले.
चंद्रयान मिशन- २ बाबत बोलताना ते म्हणाले की; सन २०१८ च्या पहिल्या तिमाहीमध्ये चंद्रयान रवाना करण्यात येईल. महेंद्रगिरी येथे चंद्रयानाच्या उड्डाणासाठी परीक्षण करण्यात येणार आहे; असेही त्यांनी सांगितले.
Dailyhunt
No comments:
Post a Comment