Thursday, 16 February 2017

सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहूला फटकारले

सामना ऑनलाइन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात लिंग परीक्षण चाचण्यांवर बंदी आहे. मात्र गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू या कंपन्यांनी त्यांच्या हिंदुस्थानात दिसणाऱ्या वेबपेजवर लिंग परीक्षणाशी संबंधित काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहूला फटकारले आहे.

एखादी कंपनी मग ती कोणत्याही देशातील असली तरी हिंदुस्थानात सेवा देणार असेल तर त्यांना हिंदुस्थानच्या कायद्यांचे पालन करावेच लागेल; असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करुन लिंग परीक्षणाशी संबंधित जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू या कंपन्यांना फटकारले.

तसेच या कंपन्यांना लिंग परीक्षणाशी संबंधित जाहिराती तातडीने त्यांच्या वेबपेजवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले. गुगलने लिंग परीक्षणाच्या जाहिराती काढून टाकल्याचे सांगितले. मात्र मोबाइलवरुन गुगलच्या मदतीने सर्च केल्यास अद्याप लिंग परीक्षणाशी संबंधित माहिती उपलब्ध अशा स्वरुपाची तक्रार सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment