Thursday, 16 February 2017

३५८ वर्षांपूर्वी झाली 'कॅशलेस' व्यवहाराची सुरुवात..

 

सध्या भारतात केंद्र शासनाच्या वतीने `कॅशलेस इकॉनॉमी` बाबत सातत्याने प्रबोधन केले जाते आहे. २१व्या शतकातही आपण जर रोख व्यवहारांना प्राधान्य देत आहोत, तर धनादेश, कार्ड पेमेंट, एटीएम या व्यवस्था का आणि केव्हा सुरू झाल्या असतील, याचा आपण कधी शोध घेतला का?

याचा शोध `मुंबई तरुण भारतच्या टीम`ने घेतला.

एका अभ्यासानुसार १६५९ साली पहिल्या सुरक्षित व्यवहारासाठी उचलले गेलेले पाऊल म्हणून धनादेशाची सुरुवात झाल्याची नोंद सापडते. तब्बल १७व्या शतकात म्हणजेच ३५८ वर्षांपूर्वी पहिल्या `कॅशलेस` व्यवहाराला ब्रिटनमध्ये सुरुवात झाली होती. आणि या व्यवहाराचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण हा मॉरिस आणि क्लेटॉन या ब्रिटिश व्यक्तींनी पहिला धनादेश अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या नावे १६ फेब्रुवारी १६५९ रोजी काढला होता.

या धनादेशाचे विशेष म्हणजे हाती लिहिलेल्या या धनादेशावर जुन्या पद्धतीची मुद्रा कोरण्यात आली आहे. अवघ्या ४०० पौंडाचा हा धनादेश एक वर्षाने म्हणजेच १६६० रोजी थॉमस जेफरसन यांनी वटवला. कारण त्यावेळी २५ मार्च रोजी नवे आर्थिक वर्ष सुरू होत असे, त्यामुळे नव्या पद्धतीने आर्थिक व्यवहारांची सुरुवात करण्याची धनादेश पद्धत अमेरिकेने एकावर्षानंतर १६६० मध्ये स्वीकारली असे म्हणावे लागेल.
ब्रिटिश आणि अमेरिकन अर्थव्यवस्थांमधील नवे बदल स्वीकारण्याची ही मानसिकता अतिशय मंद गतीने सामान्यांसाठी उघडण्यात आली. १६५९ पासून अस्तित्वात आलेली ही व्यवस्था सुरुवातीला फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारी, सधन आणि उच्चपदस्थ यांच्यासाठी अमलात होती.
आंतराष्ट्रीय स्तरावर मूल्य विनिमय आणि त्यांच्या दरनिश्चिती करून रोख रकमेचा व्यवहार करणे ही त्याकाळी तितकीच गुंतागुंतीची प्रक्रिया असावी. त्यामुळे गोल्ड स्मिथ्स यांनी १६५९ मध्ये पहिल्या धनादेशाचे वाटप केले. त्यावेळी धनादेश वटवण्यासाठी हाती लिहिलेल्या आणि जुन्या पद्धतीने मुद्रा उमटवलेल्या धनादेशाचे वाटप केले जायचे. या पहिल्या धनादेशाच्या मांडणीमध्ये कालांतराने अनेक बदल झाले. सन १८११ मध्ये सामान्य नागरिक अथवा ग्राहकांचे नाव छापून पहिला छापील आणि सध्या वापरात असलेल्या धनादेशाची सुरुवात झाली...

- धनादेश म्हणजेच रोख रकमेच्या जागी आर्थिक देवघेवीसाठी लेखी संमतीने पैसे काढण्याची अनुमती संबंधित व्यक्तीला देणे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व व्यवहार १६५९ पूर्वी रोख स्वरूपात होत असत.
- ब्रिटनमधील मॉरिस यांनी पहिला धनादेश अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या नावे १६ फेब्रुवारी, १६५९ रोजी काढला होता.
- धनादेश पद्धतीमुळे रोख रकमेच्या वापराला विश्वसनीय पर्याय प्राप्त झाला.
- त्याकाळी फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी वर्ग आणि सधन वर्गाला धनादेशाने व्यवहार करण्याचे अधिकार होते.

जाणून घ्या जगातला पहिला धनादेश केव्हा वटला होता..?जगातला पहिला बँक धनादेश ग्राहकांच्या आर्थिक देवघेवीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी १६५९ मध्ये सर्वप्रथम वापरण्यात आला होता.

No comments:

Post a Comment