नवी दिल्ली : केंद्र सरकारने 21 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) दोन नवीन अनुदान योजनांची घोषणा केली होती. सरकारच्या या योजनेमुळे नवीन घर घेणार्यांना फायदा होणार आहे. योजनेनुसार घर खरेदीदाराला त्याच्या उत्पन्नाच्या आधारे अनुदान मिळणार आहे.
पहिल्यांदा घर घेणार्याला 2.40 लाखांची सवलत मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 18 लाख असणार्यांना आणि पहिल्यांदा घर घेणार्यांना ही सवलत मिळणार आहे. याआधी ही सवलत फक्त 6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच मिळत होती. आता ती मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेनुसार सरकार गृहकृजावरील व्याजावर अनुदान देणार आहेत. याशिवाय 15 वर्षांच्या गृहकर्जाच्या कालावधीसाठी हो योजना लागू होती. आता 20 वर्षांच्या गृहकर्जासाठी ही सवलत देण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत व्याजावर मिळत असलेले अनुदान हे प्राप्तिकरमध्ये मिळणाऱ्या सवलती व्यतिरिक्त असणार आहे. हुडको आणि नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) यांच्यावर अनुदान देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत कमी उत्पन्न असलेल्या 18 हजार लोकांना एकूण 310 कोटींचे अनुदान दिले आहे. आता या नव्या निर्णयामुळे मध्यम उत्पन्न लोकांना दिलासा मिळणार आहे.
वृत्तसंस्था शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017
������������������������������������������������������������������������������������������������������
ReplyDeleteGovt Jobs
ReplyDelete