रोहतक (चंदीगड)- माझ्या दोन वर्षांच्या मुलीने आपल्या वडिलांना देशासाठी दिले आहे, अशी भावना हुतात्मा जवान मेजर सतीश दाहिया यांच्या पत्नीने आज (गुरुवार) व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दाहिया यांच्यासह चार जवान हुतात्मा झाले. बनिहारी (जि. महेंद्रगड) येथील रहिवासी असलेले दाहिया यांच्या निधनाची बातमी गावात समजल्यानंतर शोककळा पसरली होती. दाहिया यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दाहिया यांची पत्नी सुजाता म्हणाल्या, 'मेरे दो साल की बेटी ने उसका पिता दे दिया देश को.. बस इसे जादा और नई है देने को..' व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पतीच्या निधनाच्या माहितीचे पाकीट आमच्याकडे आले अन् सर्वकाही संपले. 17 फेब्रुवारी रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रेमपत्र, केक व पुष्पगुच्छ पाठविले होते. आय लव्ह यू सुजाता... तुझ्याकडून मला प्रेरणा मिळत आहे. सकाळीच ते माझ्याशी मोबाईलवरून बोलले आणि नंतर ते हुतात्मा झाल्याची माहिती आली.'
वृत्तसंस्था गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017
No comments:
Post a Comment