Thursday 16 February 2017

ईपीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज?

 

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष 2017-18मध्ये कर्मचार्‍यांच्या भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्यास अर्थ मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळणार असून त्याबाबत कोणतेही मतभेद नाही, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली आहे.

बंडारू दत्तात्रेय म्हणाले, ईपीएफवर 8.65 टक्के व्याज देण्याबाबत कोणतेही मतभेद नसून कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाचे याबाबत एकमत झाले आहे. याबाबत पुढील प्रक्रिया सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ईपीएफओच्या केंद्रीय न्यासी मंडळाने (सीबीटी) या आर्थिक वर्षात पीएफमध्ये जमा होणार्‍या कामगारांच्या रक्कमेवर 8.65 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली आहे.

दरम्यान, मागील चार वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे

No comments:

Post a Comment