Thursday, 16 February 2017

जवानांवर दगड फेकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा लष्कर प्रमुखांचा इशारा

स्थानिक तसेच बाहेरून छूपे हल्ले करणाऱ्यांच्या कारणास्तव काश्मिरी खोऱ्यात संघर्ष वाढला आहे, तसेच मृत सैनिकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळेच "जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच त्यांना लष्कर विरोधी मानले जाईल" अशी घोषणा लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे.

उत्तर काश्मीर मधील बंदीपोर येथील पररा मोहल्ला येथे लष्कर जवानांवर दगडफेक केली गेली, त्यात ३ जवान हुतात्मा झाले होते. तेथे दहशतवादी विरोधी कारवाई करताना लष्करच्या जवानांवर काही स्थानिकांनी दगडफेक केली त्यात ही घटना घडली आहे. त्याविरोधात लष्कर प्रमुख यांनी दगडफेक करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे, त्याच बरोबर सूचक इशारा देखील दिला आहे.

स्थानिक दगडफेकीमुले दहशतवादींना लष्कर विरोधी कारवाया करायला सोपे पडते, आणि जवानांना मात्र त्याविरोधी कारवाईत शहीद होण्याची वेळ येते.

Tarun Bharat

No comments:

Post a Comment