Thursday, 16 February 2017

सिनेमात राष्ट्रगीत वाजल्यावर उभे राहणे बंधनकारक नाही: सर्वोच्च न्यायालय

कुठल्याही सिनेमा किंवा लघुपट आणि माहितीपटात राष्ट्रगीत वाजल्यास प्रेक्षकांना उभे राहणे बंधनकारक नाही, असे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याआधी या विषयावरुन बरेच वाद झाले होते, तसेच अनेक लोकांवर राष्ट्रगीताच्यावेळी सिनेमागृहांमध्ये उभे न राहिल्यामुळे कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रगीत सिनेमाचा एक भाग असल्यावर त्यावेळी उभे राहणे बंधनकारक नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

अनेकदा सिनेमात राष्ट्रगीत सिनेमाचा एक भाग म्हणून वाजवण्यात येते. 'चक दे इंडिया', 'दंगल' अशा अनेक चित्रपटांमध्ये राष्ट्रगीत सिनेमाचा एक भाग म्हणून वाजविण्यात आले आहे.

मात्र अशा वेळी सिनेमागृहांमध्ये उभे राहणे बंधनकारक आहे की नाही या विषयी प्रेक्षकांच्या मनात संभ्रम होता. यावेळी राष्ट्रगीत ऐकताच उभे राहणे प्रेक्षकांच्या स्वेच्छेवर अवलंबून असेल असे सर्वोच्च न्यायालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र सिनेमागृहात चित्रपटाच्या सुरुवातीला जे राष्ट्रगीत वाजविले जाईल त्यासाठी सन्मानाप्रित्यर्थ उभे राहणे प्रेक्षकांना बंधनकारक असेल, त्यामुळे प्रेक्षकांने गैरसमज करुन घेवू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment