Monday, 15 January 2018

आता तुमचा चेहरा बनणार आधार

नवी दिल्ली- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी 'आधार' क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी 'आधार'धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय 'युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया' देणार असल्याची घोषणा सरकारनं केली होती. यामुळे आपला 'आधार' क्रमांक न उघड करता 'व्हर्च्युअल आयडी' क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. 'व्हर्च्युअल आयडी' कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला 16 अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र, अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' तयार करून घेता येईल.
हा 'व्हर्च्युअल आयडी' एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा 'व्हर्च्युअल आयडी' घ्यावा लागेल. 1 जूनपासून नवी सोय 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' 'जनरेट' करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व 'आधार' संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा 'व्हर्च्युअल आयडी'च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.
थोडक्यात याचे स्वरूप 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) सारखे असेल. 'आधार'धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा 'व्हर्च्युअल आयडी' मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

Dailyhunt

No comments:

Post a Comment