नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलात आता हवाई ताफ्याचा समावेश करण्यात येणार आहे. डोकलाम सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये तसेच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने प्रतिकार करता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चीनकडून केल्याजाणाऱ्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.
आयटीबीपी या नव्या युनिटकडून भारत-चीन सीमेवर नजर ठेवली जाणार आहे. आयटीबीपीचे प्रमुख आर.के. पचनंदा हेच या हवाई ताफ्याचे प्रमुख असतील. याद्वारे चीनच्या ‘पिपल लिबरेशन आर्मी’कडून होणाऱ्या घुसखोरीवर नजर ठेवण्यात येईल.
या ताफ्यात ट्विन इंजिन असलेल्या दोन हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याची वाहतूक करण्यासाठी, जखमी जवानांच्या तात्काळ मदतीसाठी, अन्य धान्याचा पुरवठा करण्यासाठी आणि हिमालयातील १६ हजार ते १८ हजार फुटांवर असलेल्या सीमेवर जाण्यासाठी करण्यात येईल.
आयटीबीपी हा हवाई ताफा भारत आणि चीनच्या ३,४८८ किलो मीटरच्या सीमेवर लक्ष ठेवेल. यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांच्या सीमांचा समावेश आहे. आयटीबीपीची ही दोन हेलिकॉप्टर्स चंदिगढ आणि बोरझार (गुहावटी) येथील तळावरून ऑपरेट केली जातील.
काय आहेत ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्सची वैशिष्टे
ही हेलिकॉप्टर्स एकावेळी ८ ते १० सैनिकांना घेऊन जाऊ शकतील.
आणिबाणीच्या प्रसंगी तात्काळ सीमेवर पोहोचणे आणि अधिक उंचीवर जाण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा उपयोग होणार आहे.
शस्त्रसाठा, युद्ध सामग्री अवघ्या दोनच तासात नियोजीत स्थळी पोहोचवण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येणार आहे.
या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने जवानांना रात्रीच्यावेळी सुद्धा गस्त घालता येऊ शकेल.
http://www.pudhari.news/news/National/itbp-gets-air-wing-to-keep-watch-on-china-border/
No comments:
Post a Comment