जम्मू: सीमा सुरक्षा दलाने जम्मू - काश्मीरमधील दोनशे किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची संभाव्य घुसखोरी रोखण्याच्या हेतूने हा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना जम्मू विभागाचे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख राम अवतार म्हणाले, "सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीमेवर शांतता राखण्यास सीमा सुरक्षा दलाचे प्राधान्य असते. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. मात्र पाकिस्तानकडून शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात.''
वृत्तसंस्था गुरुवार, 4 जानेवारी 2018
No comments:
Post a Comment