Monday, 15 January 2018

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

 

अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारू शकतात.

गॅलॅक्‍सी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या पाकिस्तान ऍटॉमिक एनर्जी कमिशनला संलग्न असलेल्या कंपनीने उत्तर कोरियाला इनकोनेल आणि मोनेल या युरेनियम एन्‍रिचमेन्टद्वारे आण्विक व रासायनिक हत्यारे बनवण्याच्या कामी येणाऱ्या दोन ""स्पेशलाइज्ड करोजन रेसिस्टन्ट निकेल अलॉय मेटल्स'चा नुकताच केलेला पुरवठा अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजंस एजन्सीने उजेडात आणल्यामुळे चीनच्या अखत्यारीत स्थापन झालेल्या पोनग्यांग आणि इस्लामाबादमध्ये निर्माण झालेले अवैधानिक आण्विक संबंध भारत आणि अमेरिका दोघांसाठी गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत.
अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ उत्तर कोरियाचे हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असून आता आम्ही अधिकाधिक आण्विक शस्त्रे निर्माण करणार आहोत ज्याचे बटण माझ्या टेबलावरच आहे' अशी धमकी दिली आहे. या दोन्ही धमक्‍यांचे विश्‍लेषण अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच दिवशी पाकिस्तानला लष्करी मदत थांबवण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या आणि खरोखरीच थांबवलेल्या 285 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी मदतीच्या संदर्भात केले असता यासंबंधीच्या चिंतेची व्याप्ती व गंभीरता लक्षात येते.

याच्याच जोडीला पाकिस्तानमध्ये हाफिज सईद व मौलाना मसुद अजहरसारख्या आतंकवादी नेत्यांनी तेथील सरकारवर सर्व मुस्लीम देशांचे गठबंधन करून अमेरिका व काफीर राष्ट्रांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी दबाव टाकला आहे. या दबावाला मिळालेला सकारात्मक आंतरराष्ट्रीय मुस्लीम प्रतिसाद आणि पाकिस्तानने अमेरिकेला दिलेले उद्दाम उत्तर यांमुळे आगामी लढ्याचे स्वरूप स्पष्ट होते. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारु शकतात.

संरक्षण क्षेत्रातील विश्‍लेषकांना चिकन गेम आणि गेम थियरी या शब्दव्याप्तींची कल्पना आहे. चिकन गेममध्ये एकच गाडी जाऊ शकणाऱ्या अरुंद पुलाकडे दोन चालक आपल्या गाड्या परस्परविरुद्ध दिशेने भरधाव नेत असतात; अशा वेळी पूल जवळ येत जातो तसा अन्योन्य विनाश (म्युच्युअल डिस्ट्रक्‍शन) अटळ होत जातो. अशा वेळी जो चालक थोडी देखील कच खातो तो दुसऱ्याला पुलावरून जाण्याची संधी देतो. दोन्ही गाड्यांची टक्‍कर चालकांसाठी घातकच असली तरी प्रत्येक चालक शेवटपर्यंत दुसऱ्यावर कुरघोडीसाठी प्रयत्न करत असल्यामुळे त्यांचा अहंकार, आत्मसन्मान आणि विश्‍वासपात्रता यांची सरशी झाली तरी प्राणहानी व संसाधनहानी अटळ असते. घाबरून कच खाणारा चालक चिकन माइंडेड (कोंबडीसारखा भित्रा) असतो. म्हणून याला चिकन गेम हे नाव आहे. गेम थियरीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामरिक डावपेचांमुळे विविध युद्धप्रश्‍नांसंबंधी भिन्न/विविध स्तरीय उत्तरे मिळतात.

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2)

गेम थियरी आणि चिकन गेमच्या आधारे आण्विक युद्धाचा "वॉर गेम' खेळत असताना या प्रकारच्या युद्धातील सामरिक डावपेच आणि त्यांच्या संभाव्य भीषण परिणामांची कल्पना येते. नोबेल पारितोषिक विजेते अणुशास्त्रज्ञ थॉमस स्केलिंग यांच्या म्हणण्यानुसार ""न्युक्‍लियर पावर शुड बी ऍन एफिशियंट वे टू इंड्युस अंटॉगोनिक स्टेटस् टू बॅक डाऊन. बिकॉझ ऑफ डिस्ट्रक्‍टिव्ह एक्‍केलेशन ऑफ ए पोटेंशियल न्युक्‍लियर कांफ्लिक्‍ट; देअरफोर, द हाय कॉस्ट शुड प्रिव्हेंट ऍक्‍टर्स फ्रॉम डिप्लॉइंग न्युक्‍लियर वेपन्स"". या पार्श्‍वभूमीवर आपापसांतील प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आण्विक युद्ध हा अवाजवी आणि अतार्किक पर्याय आहे. आजमितीला अमेरिका, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान हे चौघे त्यांच्यातील अन्योन्य प्रश्‍न सोडवण्यासाठी आण्विक हत्यारे आणि गतिमान फेक प्रणाल्यांच्या माध्यमातून मिळालेल्या अणुप्रतिबंध क्षमतेमुळे आण्विक युद्धाच्या वल्गना करताहेत.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने गैरआण्विक ते आण्विक देश ही मजल संभवत: स्वत:च्या अस्तित्वाची जपणूक आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मारली आहे. अमेरिका व भारताकडून होणाऱ्या संभाव्य धोक्‍यांना शह देण्यासाठी इराकवरील अमेरिकन आक्रमणानंतर उत्तर कोरियाने आणि भारताविरुद्ध छेडलेल्या प्रछन्न युद्धांचा फासा उलटल्यानंतर पाकिस्तानने प्रतिस्पर्ध्यावर सामरिक प्रतिबंध घालण्यासाठी आणि सरकार उलथवण्याच्या विचारांना आळा घालण्यासाठी अण्वस्त्रांची कास धरली. पाकिस्तानने उत्तर कोरियाला अण्वस्त्रांची गोपनीय माहिती दिली; तर उत्तर कोरियाने पाकिस्तानला 'न्युक्‍लियर फिजन रिऍक्‍टर्स' आणि क्षेपणास्त्रे दिली. आज हे दोघेही अमेरिका व भारत यांच्याशी युद्धासाठी तडफडत आहेत. तसे झाल्यास आम्ही त्याचा सर्वकष ताकदीने मुकाबला करू अशा गर्जना करत आहेत.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/sambhavy+aanvikayuddh+aani+parinamanchi+bhayavahata+bhag+1-newsid-79878441

No comments:

Post a Comment